SaVaK
सार्वजनिक वाचनालय कल्याण
स्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)
मुख्यालय 9819866347
रामबाग +91-251-231 8626
 
एक कविता तुमची एक कविता वामनदादा कर्डकांची
सार्वजनिक वाचनालय कल्याण - संस्थापक
श्री. रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे
1827-1898
  • रावबहादूर साठे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1827 (भाद्रपद शुध्द 12) रोजी झाला.
  • 1844 पर्यंत अध्ययन. भारतीय परंपरागत शिक्षणाबरोबर इंग्रजी शिक्षण. वडील मोरेश्वर इंग्रजी शिक्षणाचे पुरस्कर्ते. इतरांप्रमाणे पाश्चात्य शिक्षण घ्यावे व सरकारी नौकरी करावी हे ध्येय.
  • 1850 मध्ये पब्लिक सर्विस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. खात्यातचं बढतिच्या परिक्षा दिल्या. ज्युडीशिअल डीपार्टमेटमध्ये शिरस्तेदार म्हणून नियुक्ती झाली. न्यायखात्यात वेगळा ठसा उमटवला.
  • ठाण्यात नोकरी करीत राहण्यासाठी नव्या रेल्वे लाईनजवळील कल्याण हे ठिकाण निवडले.1 मे 1855 रोजी कल्याण- मुंबई व पुढचे कसारा-पुणे रेल्वे मार्गाचे काम सुरु झाले होते याच काळात सदाशिवभाऊंची बदली कल्याणला झाली.
  • त्यानंतर ते सहकुटुंब कल्याणला खाटिक आळी नाक्यावर रहाण्यास आले.शासनाच्या नवीन धोरणानुसार सदशिवाभाऊचीही कुलाबा जिल्ह्यात मामलेदार म्हणून नियुक्ती झाली.
  • 1 ऑगस्ट ते 5 ऑक्टोबर 1864 या दोन महिन्यासाठी सदाशिव भाऊ कल्याणला मामलेदार. वाचनाचा छंद. त्यामुळे स्वताची ग्रंथ संपदा. अनेकांनी पुस्तके वाचावी, वाचनाचा छंद जोपासावा म्हणून आपल्याच घरात 1864 मध्ये तात्पुरते ग्रंथालय सुरु केले.
सार्वजनिक वाचनालय - कल्याण
स्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.
© Sarvajanik Vachanalay Kalyan. All rights reserved. | Privacy Policy
Powered By TantraVed Jalgaon