SaVaK
सार्वजनिक वाचनालय कल्याण
स्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)
मुख्यालय 9819866347
रामबाग +91-251-231 8626
 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भव्य काव्यस्पर्धा
सार्वजनिक वाचनालय कल्याण - मान्यवरांचे अभिप्राय
कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या स्थापनेपासूनच थोरामोठ्यांनी येथे हजेरी लावली आहे. वाचनालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांना मौल्यवान सूचना केल्या आहेत. यातील काही निवडक अभिप्राय वाचकांसाठी सादर करीत आहोत...
मा. श्री. रविकिरण पराडकर
15/12/2024
आज माझ्या वर्दीतील विनोद आणि कविता या कार्यक्रमाच्या निमित्ताने, सार्वजनिक वाचनालय, कल्याण या ठिकाणी भेट द्यायचा योग आला. अतिथ्यशील कर्मचारी, अद्ययावत वाचनालय कार्यक्रमाचे नीटनेटके आयाप्पन लक्षात रहाण्यासारखे कार्यक्रमालाही वाचनालयाच्या सुजाण सभासदांनीही छान दाद दिली. वाचनालयाचे मा.डोळे, मा. परदेशी, मा. जोशी मॅडम यांचे विशेष आभार. भेटीचा शेवट गोड नाही पण तिखट वड्यांनी छानच झाला.
मा. श्री. सुबोध चितळे
08/12/2024
सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे आज चोखंदळ प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. वाचनालयाच्या स्टाफचे विशेष आभार यांनी अंत्यत चोख व्यवस्था ठेवल्याबद्दल ! काही प्रेक्षकांनी आणखीन वेगवेगळे कार्यक्रम करण्याबाबत आग्रह केले. कित्येकांनी फोटो काढल्यामुळे स्टार झाल्यासारखे वाटले. बारस्कर सर व इतर उपस्थित मंडळ प्रतिनिधी यांनी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचेही आभार. गोड आठवण चटकदार वडे यांची सांगड घालत सांगता झाली.
मा. प्रा. अशोक बागवे
16/11/2024
सार्वजनिक वाचनालय कल्याण हे एक सांस्कृतिक पर्यावरणातील मातब्बर ग्रंथघर आहे. इथे आल्या नंतर पुस्तके आपल्याशी सवांद साधतात आणि आपल्या नकळत सुसंकृत होत जातो. माझे स्नेह भिकू बारस्कर हे अगदी मायेने ग्रंथलयाचे कार्य अहनिर्ष करताना दिसतात. इथे आपलेपणाचे दालन आहे. मायेची शालन आहे. इथे येऊन मी नेहमी कृतार्थ होतो.
मंगला गोडबोले
10/02/2024
कल्याण सार्वजनिक वाचनालयाने आज त्यांच्या १६० व्या वर्धापनदिनानिमित्त माझा गौरव केला. त्यामुळे मी भारावून गेले. वाचनालयाच्या प्रदीर्घ कामगिरीला व कार्यकर्त्यांच्या निरुलस कार्याला मी मन:पूर्वक अभिवादन करते.
मा. श्री. रविंद्र शोभणे
10/02/2024
सार्वजनिक वाचनालय, कल्याणच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या निमित्ताने भेट देण्याचा योग आला. या वाचनालयाची अन्य वास्त, समृद्ध ग्रंथालय आणि वाचक वर्ग यांच्या ग्रांथिक व्यवहाराने आणि संस्कारांनी ही वास्तू पावन झालेली आहे. आपण या ग्रंथलयात हरवून जावे, अशी ही समृद्ध परंपरा आहे. या ग्रंथलयाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा !
प्रशांत दामले
15/10/2022
वाचन प्रेरणा-दिनाचे औचित्य साधून आपल्या वाचनालयाने बोलावले . पुन्हा एकदा निमंत्रण दिले . धन्यवाद !
एकनाथ आव्हाड
27/04/2022
आज सार्वजनिक वाचनालय ,कल्याणच्या बाल वाचन शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहण्याचा योग आला. कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन ग्रंथालयाने अतिशय उत्तम केले होते. मुलंही खूप खूष दिसली, हेच या उपक्रमाचे खरे यश !
विश्वास पाटील
26/02/2022
सार्वजनिक वाचनालय कल्याण आज ग्रंथ पारितोषिक वितरणाच्या निमिताने ऐतिहासिक कल्याण नगरी मध्ये आगमन झाले. दीड लाख ग्रंथसंपदा , तीन हजार वाचक आणि १५७ वर्षांची परंपरा ! अशा समृद्ध वाचनालयात वेळ व्यतीत करताना खूप आनंद झाला. ही दीर्घ परंपरा भविष्यात सुद्धा अशीच अखंड चालु रहावी ही शुभेच्छा.
अजिंक्य विश्वास
14/11/2021
आज सुहास शिरवळकर यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला 'सार्वजनिक वाचनालय कल्याण' येथे शिरवळकर कुटुंबिय, चाहते, वाचकवर्ग आणि ग्रंथालयाचे कार्यकर्ते यांच्या सोबत 'पुस्तक प्रदान सोहळा' या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले. हे सू. शिं. चा वाचक म्हणून माझे भाग्यच ! कार्यक्रम दृष्ट लागण्याइतका सुरेख झाला. वाचनालयाचे आभार आणि त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा !
इक्बाल मुकादम
14/11/2021
सू. शि. एक किताब हा लेख 'पथदीप' या पुस्तकात आहेच. एक मित्र फिलोसोफर अँड गाईड आजही तरुणांच्या हृदयावर राज्य करतात ते सु. शि. !
12345678910
सार्वजनिक वाचनालय - कल्याण
स्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.
© Sarvajanik Vachanalay Kalyan. All rights reserved. | Privacy Policy
Powered By TantraVed Jalgaon