SaVaK
सार्वजनिक वाचनालय कल्याण
स्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)
मुख्यालय 9819866347
रामबाग +91-251-231 8626
 
सार्वजनिक वाचनालय कल्याण - शंका निरसन [F.A.Q.]
अनु. क्र. प्रश्न - उत्तर
1
वाचनालयाचे सभासद कोणाला होता येते ?
कल्याण शहरातल्या रहिवाशांनाच वाचनालयाचे सभासद होता येईल.
2
सभासद होताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?
कल्याण शहाराचा रहिवाशी असणा-याने विहीत नमुन्यातील अर्ज (मुल्य रू. 5/-) घेवून तो पूर्ण भ्ररणे आवश्यक आहे. पूर्ण भरलेला अर्ज आपल्या निवासाचा दाखल्यासह (रेशनकार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/आधारकार्ड/लाईट बील अथवा फोन बिल) यांच्या पैकी एकाची झेरॉक्स प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
3
अर्ज भरल्यावर त्वरीत सभासदत्व कधी मिळते?
पूर्ण भरलेला अर्ज ग्रंथपालाकडे सुपूर्त केल्यानंतर त्यास नजीकच्या कार्यकारणी सभेत मान्यता घेतली जाते. कार्यकारिणीने मंजूर केलेल्या नियोजित सभासदांची यादी सूचना फलकावर लावण्यात येईल व त्यांना दूरध्वनी व एस.एम.एस.द्वारे सूचित करण्यात येईल. घटनेनुसार सभासदत्व देण्याचा व नाकारण्याचा अधिकार कार्यकारिणीचा आहे. सभासदत्व नाकारताना कोणतेही कारण देण्याचे वाचनालयास बंधन नाही.
4
वाचनालयाची सभासदत्व फी किती आहे?
वाचनालयाचे सभासद होताना 50/-रुपये महिना वा वार्षिक रु.500/-वर्गणी भरावयाची आहे. त्याचबरोबर रुपये 500/-अनामत रक्कम सभासद होतानाच भरावयाची आहे. अधिक प्रवेश फी रु.15/- असे एकुण मासिक वर्गणीदारांना 565/- वार्षिक वर्गणीदारांना 1015/- भरावयाचे असतात.
5
वाचक पुस्तक किती दिवस घरी ठेवू शकातो ?
वाचकांना पुस्तक 15 दिवस घरी वाचावयास देण्याात येते. पंधरा दिवसानंतर 16 वे दिवसापासून दर दिवशी 2/- रुपये दंड आकारण्यात येतो.
6
पुस्तकांना मुदत वाढ मिळते का ?
होय, वाचक (दुरध्वनी 2213190,भ्रमणध्वनी 8767169331 (मुख्य शाखेसाठी) रामबागेसाठी २३१८२६) किंवा ईमेलद्वारे savak.kalyan @gmail.com) नुतनीकरण करु शकतात. मुदत वाढ एका पुस्तकासाठी दोन वेळेसच करता येईल. मात्र वाचानाकांकडून कडून पुस्तकाला मागणी आल्यास मुदत वाढ नाकारली जावू शकते.
7
वर्गणी कधी भरावी ?
सभासदांनी आपली वर्गणी महिन्याच्या 30 तारखे पर्यंत भरणे आवश्यक आहे. न भरल्यास मासिक रुपये 2/- प्रमाणे दंड आकारण्यात येईल.
8
सभासदत्व रदृ कधी होते?
सभासदाने आपली वर्गणी सलग तीन महिने थकवल्यास वा पुस्तक वारंवार आठवण (फोन, sms वगैरे द्वारे) करुनही परत न केल्यास,अथवा हरवलेले पुस्तक दुर्मिळ असेल व त्याचे पुनर्मुद्रण झालेले नसल्यास कोणतेही कारण न देता सभासदत्व रदृ करण्याचा अधिकार कार्यकारणीला आहे.
9
मासिक 50/- रुपये फी मधे किती पुस्तकेघरी वाचावयास मिळतात ?
वाचक सभासदांना एका वेळी दोन पुस्तके घरी वाचावयास नेता येतात.
10
मासिक व बालविभागाचे सभासद होताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
मासिक व बालविभागाचे सभासदत्व विहित नमुन्यातील अर्ज भरुन त्वरीत घेता येते.
11
मासिक व दिवाळी अंकाची वर्गणी किती?
मासिके व दिवाळी अंक हा संपूर्णपणे वेगळा विभाग असून मासिकाची वर्गणी महिना रु 50/-,अनामत रुपये 50/-,प्रवेश फी रुपये 15/-,अर्ज शुल्क रुपये 5/- एकूण रुपये 120/-आहे.
12
बालविभागाची वर्गणी किती?
बालविभागाची वर्गणी महिना रुपये 2/- प्रमाणे वार्षिक वर्गणी रुपये 24/- घेण्यात येईल तसेच अनामत रुपये 50/-,प्रवेश फी रुपये15/-,अर्ज शुल्क रुपये 5/-,प्रमाणे एकूण रुपये94/-आहे.
13
वाचकांनी पुस्तकांचा शोध कसा घ्यावा?
मुख्य शाखेमध्ये वाचकंना पुस्तकांपर्यंत मुक्त प्रवेश आहे. वाचक हवे असलेले पुस्तक त्या त्या विभागात ते स्वत: शोधू शकतात. तसेच संगणकीय प्रणाली नुसार किंवा टंकलिखीत स्वरुपातील उपलब्ध याद्या पाहून पुस्तक शोध घेता येतो. तरीही पुस्तक न मिळाल्यास कर्मचा-यांची सहाय्यता घेउ शकतात वा ग्रंथपालाला सांगू शकतात.
14
रामबाग शाखेतल्या पुस्तक देव-घेव विषयी?
रामाबाग शाखेत वाचकांना पुस्तकांपर्यंत मुक्त प्रवेश नाही. रामबाग शाखेत वाचकांना आपल्याला हवी असलेली पुस्तके उपलब्ध सुचीतील वर्गांकानुसार कर्मचा-यांना दिल्यास मिळतील.
15
वाचकांकडून अपेक्षा
वाचनालय हे सरस्वतीचे मंदिर आहे.वाचनामुळे सुसंस्कृत बनतो आणि म्हणूनच वाचकांनी पुस्तकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
16
वाचनालयाचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस कोणता ?
वाचनालयाला दर गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असते.
सार्वजनिक वाचनालय - कल्याण
स्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.
© Sarvajanik Vachanalay Kalyan. All rights reserved.
A joint venture by Unique Computers & TantraVed'